बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

बिजनौर | उत्तर प्रदेशच्या बिजनौर मधील हसनपूर या गावात दसऱ्या दिवशी एक दु:खद घटना घडली आहे. दसऱ्यानिमित्त रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु रामलीलेमध्ये दशरथाची भूमिका साकारणाऱ्या राजेंद्र सिंह यांनी मंचावरच आपले प्राण सोडले. राजेंद्र सिंह हे अभिनयच करत असल्याचा समज काही काळासाठी उपस्थितांचा झाला.

नाटक संपल्यानंतर देखील राजेंद्र सिंह बराच काळ निपचित पडून राहिले. यामुळे उपस्थितांना शंका आल्यानं त्यांना उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांनी जागीच आपले प्राण सोडले होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, श्री राम वनवासाला चालले असल्याचा प्रसंग मंचावर चालू होता. पुत्र वियोगाने दशरथ व्याकूळ झाले होते. यामुळे ते राम नामाचा गजर करत होते. राम नामाचा गजर करतानाच ते जमिनीवर कोसळतात आणि यावेळी खरोखरच दशरथ बनलेल्या राजेंद्र सिंह यांचा मृत्यू होतो.

गेल्या 20 वर्षांपासून राजेंद्र सिंह दशरथाची भूमिका साकारत होते. शेवटी दशरथाची भूमिका साकारतानच त्यांची प्राणज्योत मालवली. हसनपूर गावातील या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More