वर्धा | कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेले दिड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी वक्तव्य केलं आहे.
सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी असल्याचं भुपेश बघेल यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध गांधीजींच्या आश्रमाला मुख्यमंत्री बघेल यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी चर्चा करतांना ते बोलत होते.
तसंच गांधीजींच्या १५०व्या जयंती पर्वावर त्यांच्या विचारांप्रमाणे विविध योजना तयार करून राज्यात अमलात आणल्या आहे. यातून ग्रामस्वावंलबनातून विकास,रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारल्यावर आता सध्या तर अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. पुढे मात्र पसंती राहुल गांधी यांना राहिल असं भुपेश बघेल यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात”
“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”
जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….