मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
भेंडीबाजार म्हणलं की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहराम पाडा म्हणलं की मातोश्रीला त्रास होतो, असा टोलाही शेलारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे अजूनही वस्तादच आहेत. ते आजही सगळ्यांशी एकटेच लढत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”
“अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा”
‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजू
“चहल मी लक्षात ठेवेल, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं”
“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”