बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो, देवांक…”, आशिष शेलारांचं मालवणी भाषेत ट्विट

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg state bank election) भाजपने सरशी मारली आहे. महाविकास आघाडीला मात्र, मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावतं (shivsena satish sawant) यांचा पराभव झाला आहे.  महाविकास आघाडीच्या पराभवावरून भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी टोला लगावला आहे.

“देवांक सोडल्यानं अन् देवचराक धरल्यानं आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यानं आज सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो..” असं मालवणी भाषेतून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. याशिवाय नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाची ही नांदी आहे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलारांनी यावेळी महाविकास आघाडीला आव्हानदेखील दिला आहे. अमितभाई शाह म्हणाले, त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघंही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असंही शेलार म्हणाले आहेत. आशिष शेलारांबरोबरचं अनेक भाजप नेत्यांनी आघाडी सरकारच्या पराभवावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत भाजपने सरशी मारली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावतं यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे. सावंत याचा पराभव करत विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर नितेश राणेंची पहिली पोस्ट, म्हणाले…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपची सरशी, सतीश सावतं यांचा पराभव

‘ मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’

“माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासाारखी बोलतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More