मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आणि बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदारून दूर करा या मागणीसाठी पत्र लिहल्याचं वृत्त आलं होतं. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सोनिया गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी वर्णी लावावी, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींकडे केल्याचं माहिती समोर आली होती. मात्र ती अफवा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, हे पत्र खरंच चव्हाण यांनी लिहिलं आहे का? आणि जर लिहिलं असेल तर त्यांना खरंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे का? पक्ष काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
काँग्रेस अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. क़ृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 13, 2020
कांग्रेस अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी को मेरे एक पत्र लिखने के संदर्भ में आ रही खबर सरासर झूठ है। जानबूझकर मेरी बदनामी की जा रही है। मैंने ऐसा कोई पत्र नहीं लिखा है। कृपया ऐसी झुठी खबर पर ध्यान नहीं दें।
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 13, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री!
“मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे”
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करवीशी वाटते- चंद्रकांत पाटील
उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री…- शरद पवार
थोरातांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?
Comments are closed.