Top News नांदेड महाराष्ट्र

आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण

नांदेड |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादीचे नेते आणि जसलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाणांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. भोकरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान जयंत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं होतं.

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यात फेरफार करुन त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण

धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं

नोटाबंदीनंतर चलनातील या महत्वाच्या नोटा होणार बंद??; RBI ची महत्वाची माहिती

‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!

‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या