परभणी महाराष्ट्र

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

परभणी | दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलंय.

विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकणारे परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी केली. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.

भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचं काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या बातम्या-

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या