विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

मुंबई | काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यावर अशोक चव्हाणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसंच याबाबत पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवल्या जातील, असं चव्हाणांनी सांगितलं. 

उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधीच घेतील. पक्षाने दिली तर ती जबाबदारीही घ्यायला मी तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, 2019मध्ये सत्तांतर झाल्यास काँग्रेसकडून अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. दक्षिण नांदेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारला आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?-हर्षवर्धन जाधव

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले

-राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

-संघाच्या लाठीवर बंदी घालावी; न्यायालयाने बजावली नोटीस

-तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!