अहमदनगर | उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची उत्स्फूर्त झालेली गर्दी आणि त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज आणि युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचं समर्थन वाढत आहे. त्यामुळे मतदानानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी खोचक टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.
मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणला, त्यामुळे वीज, पाणी, रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या. आता पुढील काळात शेतीला कायम पाणी मिळावे यासाठी कृष्णा, भीमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार असल्याचं राम शिंदे म्हणाले आहेत.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील उरेवस्ती येथे राम शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मतदारसंघात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता मतदारांनी ठरवले आहे आमदाराला मत द्यायचे की नामदारला, असंही राम शिंदे म्हणाले आहेत.
विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावं, असंही आव्हानही त्यांनी दिले. केवळ चॉकलेट, गोळ्या आणि सॅनिटरी पॅड वाटून मतं मिळत नाहीत. येथील जनता अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही, आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे जनता दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राम शिंदे यांनी नान्नज गावात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच मुस्लिम समाजाची बैठक युवा नेते अमजद पठाण यांनी घडवून आणली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या-
एकच उल्हास, बाकी सब खल्लास; धैर्यशील मानेंची शिवगर्जना – https://t.co/QJ7QP39SBd @mpdhairyasheel
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
प्रचारासभेनंतर राज ठाकरेंनी घेतला मुंबईतल्या ‘या’ प्रसिद्ध मिसळीचा आस्वाद https://t.co/VS7OAUvGkc @RajThackeray @mnsadhikrut #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
“शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत”- https://t.co/55Wl1Py84Y @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
Comments are closed.