Top News नागपूर

‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!

नागपूर | राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकींची अधिक चर्चा आहे. अर्ज भरण्यासाठी तर उमेदवारांची धावपळ सुरु आहे. अशाच परिस्थितीत नागपूरच्या एका केंद्रावर आपल्या दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली होती.

उमेदवार सपना नागपुरे यांनी यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात नक्की बाजी मारणार असल्याचं सांगितलंय.

सपना नागपुरे म्हणाल्या, “देवलामेटी गावचा विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यंदा माझी मुलगी क्रिशिता देखील माझ्यासोबत आहे. त्यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात आम्ही नक्की बाजी मारणार”

“कोरोनाचा काळ असल्याने सर्व सूचनांचं पालन केलंय आणि मतदान केंद्रावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलोय. अर्ज दाखल केला असून आता प्रचार आणि निवडणुकीची उत्सुकता आहे”, असंही सपना म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!

सिद्धिविनायकाच्या दर्शनावेळी कंगणासोबत दर्शन घेणाऱ्या राज ठाकरेंच्या मसल मॅनने कंगणासोबतच्या नात्याचा केला उलगडा

दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री केजरीवालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; वेतनात वाढ, सेवानिवृत्तीचं वयही वाढवलं

‘आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो….’; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या