भारतातील ७० टक्के एटीएम असुरक्षित, हायअलर्ट जारी

नवी दिल्ली | जगभरातील जवळपास ९९ देशांमध्ये शुक्रवारी सायबर हल्ला झाला. यावेळी भारतातील आंध्र प्रदेशमधील पोलिसांचे संगणकही हॅकर्सनी हॅक केले. धक्कादायक बाब म्हणजे आता भारतातील एटीएम्स हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं समजतंय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेसह सर्व वित्तीय संस्थांना हायअलर्ट देण्यात आलाय.

भारतातील सुमारे ७०% एटीएममध्ये विंडोज एक्सपी वापरली जाते. या प्रणालीचा सपोर्ट मायक्रोसॉफ्टने काढून घेतलाय, त्यामुळे हे मशिन्स सायबर हल्ल्याची सहज शिकार होऊ शकतात.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या