बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

मुंबई | भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पत्रकार दिनेश कानजी यांच्या लेखाची लिंक शेअर करत शिवसेनेवर टीका केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही. सामनातून दर चार दिवसांनी राहुल गांधी यांची आरती ओवाळली जात असताना त्यांनी मात्र शिवसेनेला जागा दाखवून दिली, असं दिनेश कानजी यांनी लेखात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींपासून अहमद पटेलांपर्यंत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला त्यांना अभिवादन करावंसं वाटलं नाही, असं दिनेश कानजी यांनी म्हटलंय.

शिवसेनाप्रमुखांना अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार होऊनसुद्धा गप्प बसणे ही शिवसेनेची लाचारी नाही का? असा सवाल नेटकरी करत आहेत, असं दिनेश कानजी यांनी लेखात म्हटलं आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर टीका केलीये.

 

थोडक्यात बातम्या-

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या- अमृता फडणवीस

“कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही

मनसे आमदार राजू पाटील नितीन गडकरींच्या भेटीला!

सिरमचे संस्थापक माझे मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण…- शरद पवार

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More