बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर अतुल भातखळकरांचं उत्तर, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. केंद्रातलं आणि महाराष्ट्राचं राजकारण, मनसेची वाटचाल, कोरोना काळातील अनुभव अशा अनेक विषयावर त्यांनी आपलं मत सर्वांसमोर मांडलं आहे. या मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांनी अतुल भातखळकर यांच्याबाबतीत एक गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता भातखळकरांनी उत्तर दिलं आहे.

पक्षातील माणसं सोडून जाताना दिसत आहे, पक्ष वाढण्यासाठी मनसे काय काम करत आहे?, असं मुलाखतकारांनी राज ठाकरे यांना विचारलं होतं. ‘पक्षातील माणसं सोडून जातातच. त्यांचं जाणं येणं चालूच असतं, माझ्या पक्षात देखील अनेकजण येण्यास तयार आहेत. मागे एकदा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. त्याच्या सोबत कोणीतरी लोखंडे देखील होते. मी गडकरींना फोन करून सांगितलं आणि त्यांना परत पाठवलं’, असं या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले होते. परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. 2009 च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना 2021 ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय, असं भातखळकर म्हणाले.

गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करत आहे, असं देखील भातखळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More