बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | Audi खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ऑडी खरेदी करायची असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जर्मनीची लक्झरी कार कंपनी ऑडीने त्यांच्या गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

ऑडी कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑडी वाहनांच्या नवीन किमती 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. वाढत्या खर्चामुळे किमतीत वाढ करण्यात येत असल्याचं कंपनीने एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.

वाढती किंमत आणि बदलते परकीय चलन यांचे दर लक्षात घेऊन आम्हाला आमच्या वाहनांच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढवाव्या लागतील, असं ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनी सांगितलं आहे. कंपनीच्या निर्णयामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, कंपनीने भारताच्या लाइनअपमध्ये पेट्रोलवर चालणारी Audi A4, Audi A6, Audi A8L, Audi Q2,Audi Q5 आणि अशातच लाँच झालेली Audi Q7, Audi Q8, Audi S5 Sportsback, Audi RS 5 Sportsback, Audi RS 7 Sportsback आणि Audi RS Q8 या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेत वादाची ठिणगी?, महत्त्वाची माहिती समोर

रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…

“…तर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More