बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल सुरू; रूग्णसंख्येत तब्बल 8 हजारांची घट

औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या ही देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याचं स्पष्ट झालं होतं.

औरंगाबाद शहरामध्ये सलग दोन महिन्यापासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच आता शहरातून कोरोना संदर्भात सकारात्मक आणि दिलासादायक चित्र समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

31 मार्च रोजी औरंगाबादमध्ये 10 हजार 915 कोरोना रुग्ण रुग्णालयात उपचाराधीन होते. त्यानंतर, 5 मे रोजी ही संख्या 2 हजार 785 वर आली आहे. औरंगाबाद शहरातील बरे होणाऱ्यांची टक्केवारीही 94.52 वर आली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहर कोरोनावर मात करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पसरलं आहे.

मागच्या 36 दिवसांमध्ये औरंगाबाद शहरातील 10 हजारात असणारी रुग्णसंख्या ही अवघ्या 2 हजारांवर आल्याने हे शहर लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं बोललं जात आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी फक्त 30 टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत. परंतु, चिंताजनक गोष्ट म्हणजे 70 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता प्रशासनाला आणखी कठोर परिश्रम घेऊन कोरोनाशी दोन हात करण्याची गरज आहे. रुग्ण संख्येतील हीच घट कायम राहिली तर लवकरच औरंगाबाद शहर कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’; आमदार शशिकांत शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यात आज अजित पवारांची आढावा बैठक; कडक लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता

“कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने काय पूर्वतयारी केली, याचा तपशील सादर करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More