बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबाद हळहळलं; शस्त्रक्रीया करताना डाॅक्टरला ह्रदयविकाराचा झटका

औरंगाबाद | औरंगाबाद येथे आंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एक डाॅक्टर शस्त्रक्रीया करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात असून या डाॅक्टरांचं नाव दिग्विजय शिंदे असं आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. दिग्विजय शिंदे हे फिजिशियन इंटेंसिविस्ट होते. ते मूळचे इटखेडा येथील आहेत. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दिग्विजय प्रॅक्टिस करत होते. यादरम्यान ते दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करत होते. मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खाजगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटल येथे ते रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉ. शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. परंतू सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला.

थोडक्यात बातम्या-

मास्क न घालणं नवरेवाला पडलं महागात; पोलिसांनी दंड ठोठावत दिला कारवाईचा आहेर

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; घेतला हा मोठा निर्णय

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More