बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आव्हाड साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा”

 पुणे | म्हाडा पेपरफुटी प्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरही चांगलंच तापलं आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचं प्रकरण ताज असताना अचानक आदल्या रात्री म्हाडाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. अचानकपणे रद्द परिक्षा रद्द झाल्यानं (MHADA Exam Cancelled) विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ झालेली पहायला मिळाली.

म्हाडाच्या परिक्षेवरुन राजकारण तापलेलं असतानाच आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी या वादात उडी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका, त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. तुम्हाला जर नीट परिक्षा घेता येत नसेल, तर साहेब राजीनामा द्या आणि घरी बसा, असा संताप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आव्हाडांवर व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, तुमचेच लोक पेपर फोडत असतील आणि प्रत्येक पदावर लाखो रुपयांचा बाजार त्या ठिकाणी फुटत असेल याला फक्त मंत्री आणि सरकारच जबाबदार आहेत. याशिवाय कुंपनच शेत खात असेल तर काय बोलणार असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही याप्रकरणावरुन सरकावर निशाणा साधला होता. परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी फडणवीसांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

एसटी संप: “आता माघार नाही, जी कारवाई करायची ती करा”

किरीट सोमय्या लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट; ‘हे’ घोटाळे करणार उघड

“…म्हणून ‘या’ मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”

“शरद पवारांचा पक्ष बनला तेव्हापासूनच ‘ते’ पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत आहेत”

तब्बल 21 वर्षांनी भारतानं जिंकला Miss Universeचा खिताब; ‘ही’ व्यक्ती ठरली मानकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More