बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही!

मुंबई | उच्च न्यायालयने 2017 मध्ये दिलेल्या एका निर्णयानुसार पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवलं होतं. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. परंतू उच्च न्यायालयाच्या या निर्णयास अद्याप स्थगिती दिलेली नसल्यानं पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदं सेवाज्येष्ठतेनं भरण्यात यावीत, असा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना शासनाने खुल्या वर्गासाठी सुखद निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची काही काळानंतर पदोन्नती होते. त्यांना बढतीचं पद मिळतं. पण जर आरक्षित आणि खुल्या वर्गातील व्यक्ती, वरील पदासाठी पात्र असतील तर सर्वप्रथम आरक्षित व्यक्तीला बढतीचं पद दिलं जातं. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो. पण आता शासनाच्या निर्णयाने बढतीचं पद आता आरक्षण नाही तर सेवाज्येष्ठच्या आधारावर भरली जाणार आहे. म्हणजे ज्याने जास्त काळ सरकारी कर्मचारी म्हणून काम केलं आहे त्याची पदोन्नती होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे 2004 सालापासून पदोन्नती रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. सत्ताधारी पक्षातल्या काही मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी लावून धरली होती.

दरम्यान, जे मे 2004 नंतर शासन सेवेत रूजू आहेत, त्यांना करताना पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ घेऊन सध्याच्या सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आलेल्या कोणत्याही मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती करण्यात येऊ नये, असं देखील या निर्णयात सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

रिया चक्रवर्तीच्या ‘रिअल लाईफ हिरो’चा कोरोनाने घेतला बळी

‘गाडी विकून जे पैसे येतील ते आईला द्या, तिची काळजी घ्या’; खडकवासला धरणात उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या

कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णाची दारुपार्टी; बायको-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धरलं अन्…

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More