Top News राजकारण

“मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण; दुसरं स्वप्न आम्ही पूर्ण करू”

मुंबई | आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त बाळासाहेबांची एक इच्छा पूर्ण करणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “यंदाच्या वर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं एक स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलंय.”

भुजबळ पुढे म्हणाले, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. तर बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे. आणि दे देखील स्वप्न आम्ही पूर्ण करु.”

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्याची सर्वांगिण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया.”

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का; ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक; प्रवीण दरेकरांची टीका

स्वर्गीय बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया- उपमुख्यमंत्री

“महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही”

केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही; WHOचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या