मुंबई | काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक भेट घेऊन आले. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘भालके कुठे असता आजकाल दिसत नाही’, असं विचारलं. मात्र भालकेंनी यावर काहीही उत्तर दिलं नाही.
सह्याद्री अतिथीगृहात बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरस्थितीबाबत निवेदन दिलं. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर भारत भालकेंनी मात्र वैयक्तिक काम असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून भालके भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मागच्या महिन्यात मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात गेले असता त्यांनी आवर्जून भालकेंच्या घरी जाऊन फराळ घेतला होता.
दरम्यान, भालकेंचं हे निरूत्तर रूप काँग्रेसची चिंता वाढवणारं असल्याचं बोललं जातंय.
महत्वाच्या बातम्या-
-मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा
रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??
-मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!
-पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत
-“आपल्याला कोणाची साथ नाही; मुर्खांच्या स्वर्गात राहू नका!”
Comments are closed.