बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश ही आमच्यासाठी अभिमानाची बाब”

मुंबई | आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला. या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होणे ही आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी नेतृत्व कसं करावं हे दाखवून दिलं आहे. हे सरकार तीन पक्षांचं आहे. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं उत्तम नेतृत्व करत आहेत, अशा शब्दात थोरातांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

हे महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करणारं आहे. वेगवेगळी विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचं यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 2933 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

पुण्यात आज 157 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले

‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम, मंत्री मुश्रीफांची घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More