मुंबई | मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. पण हा निर्णय अनाकलनीय आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
स्थगितीचा विषय नसताना न्यायालयाने हा निकाल दिला. यात पुढे कसं जायचं ते सरकार ठरवत आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सर्वांना एकत्र घेऊन याबाबत पुढे जायचं आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांशी बोलले आहेत. न्यायालयात कशा प्रकारे जायचं, असंही थोरातांनी सांगितलंय.
राज्यातील वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि सरकारला कसं बदनाम करता येईल, हे पाहिलं जातं आहे. याला महाराष्ट्राने तोंड दिलं पाहिजे. काही विषयात राजकारण करता कामा नये. अजून निवडणुकीला 4 वर्ष आहेत, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका”
लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण
मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणांनी घेतली राजनाथ सिंग यांची भेट!
विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही- रोहित पवार