मुंबई | राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील हिंदुत्वाच्या मुद्यांवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये. तर यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट राज्यपालांना सवाल केलाय.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकानं उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी मा. राष्ट्रपती सहमत आहेत का?, असा सवाल केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी मा. राष्ट्रपती सहमत आहेत का?
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 13, 2020
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकानं उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?”
महत्त्वाच्या बातम्या
‘बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते’; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले
वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात? उर्जामंत्र्यांचं धक्कादायक ट्विट
कलम 370 हटवलेला दिवस काश्मिरसाठी काळा दिवस; मेहबूबा मुफ्तींचा हल्लाबोल