बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मुंबई | बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालने येणाऱ्या टी ट्वेन्टी सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सिरीज खेळण्यासाठी सज्ज झालेल्या बांगलादेश टीमला यामुळे मात्र मोठा झटका बसला आहे.

तमीम इक्बालने आपल्या वैयक्तिक कारणांमुळे आपण ही सिरीज खेळणार नसल्याच सांगितलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका देखील तो खेळेल की नाही, याची साशंकता आहे. मात्र, मायदेशी परतण्याआधी काही मॅचस खेळेन, अस तमीमने सांगितलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 20 मार्च पासून सुरुवात होत आहे. ही एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर 3 टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका दोन्ही देशांमध्ये खेळवली जाणार आहे.

बांगलादेश संघाचा कर्णधार तमीमने गुरुवारी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या निर्णयाविषयी सांगितलं. तो म्हणाला मी माझ्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. माझं टीम मॅनेंजमेंट आणि मुख्य प्रशिक्षकांशी बोलणं झालं आहे. त्यामुळे मी फक्त एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच पहिल्या मॅचमध्ये मी खेळेन, अशी मला आशा आहे. तर हैमस्ट्रिंगच्या दुखापतीतून मी आता सावरत आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं.

दरम्यान, बांगलादेशच्या संघातला धडाकेबाज खेळाडू शाकिब अल हसनची कमी जाणवत आहे. यावर तमीम म्हणाला, प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू संघात असेलच असं नाही. पण आपण संबंधित खेळाडूशिवाय खेळण्याची तयारी ठेवली पाहिजे. मात्र पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल 2021 मध्ये शाकिब कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.

थोडक्यात बातम्या

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

गच्चीत उभा असताना त्याचा तोल गेला, अन्…, पाहा व्हिडीओ

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More