शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करा, ऊर्जामंत्र्यांचं आमदारांना फर्मान

मुंबई | शेतककऱ्यांकडून थकीत वीजबिलाची वसुली करा, असं फर्मान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांना सोडलंय. त्यासाठी त्यांनी राज्यातील आमदारांना पत्रही लिहिलंय.

कृषिपंपधारक म्हणजेच शेतकऱ्यांनी वीजबिल भरावं यासाठी मेळावे आणि शिबीरं घ्यावीत तसेच महावितरणला वीजबिल वसुलीसाठी सहकार्य करावं, असं बावनकुळे यांनी पत्रात म्हटलंय. 

बावनकुळेंच्या या पत्रामुळे वीजबिल वसूल करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झालाय तसेच आमदारांनी शेतकऱ्यांच्या मागे वीजबिलासाठी तगादा लावायचा का?, असा प्रश्नही विचारला जातोय.