पुणे | दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांनी पुण्याला हदरवून सोडलं आहे. पुण्यात होणारे गुन्हे आता सुनसान रस्ते किंवा एकांतात न होता दिवसाढवळ्या भररस्त्यात होताना दिसत आहे. याचदरम्यान भररस्त्यात तरुणाची हत्या केल्याचा अजून एक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील पौड येथे ही घटना झाली आहे. अगदी रस्त्यावरुन येण्या-जाणाच्या शुल्लक कारणावरुन भरस्त्यात बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्याचं कळतंय. यादरम्यान 40 वर्षाच्या अर्जून रागू साठे या नावाच्या एका माणसाला गोळी लागल्या कारण त्याचा मृत्यू झाल्याचं या प्रकरणात समोर आलं आहे.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच जवळच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होतं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजानान मारणेची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या टोळीने काढलेल्या जंगी मिरवणुकीने सर्वांनाच धक्का बसला होता. एक्सप्रेसवेवरून गजानन मारणे मुंबईहून पुण्याला येताना त्याच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्यांचा रोड शो केला. यानंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या-
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”
‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!
मी कोरोनाला कधीच घाबरलो नाही, कारण…- भगतसिंह कोश्यारी
Comments are closed.