बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

नवी दिल्ली | कोरोनानं देशात हाहाकार माजवला आहे. लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचं मत होतं की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळे मुलांचे पालक चिंतेत आहेत. अशातच आता वैज्ञानिकांनी लहान मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी एक अनोखं टेस्टींग किट विकसित केली असल्याचं समोर येत आहे.

लहान मुलांच्या नाकातून आणि घशातून स्वॅब घेण्यासाठी अडचण येते, अशा मुलांसाठी नवीन टेस्टींग किट तयार करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटला ‘लॉलीपॉप टेस्टींग किट’ असं नाव देण्यात आलं आहे.

एका कॉटन स्वॅबला तोंडात ठेऊन लॉलीपॉपप्रमाणे चोखायचं, त्यामुळे लहान मुलांच्या स्वॅबचा नमूना किटच्या स्टीकवर येतो. त्यानंतर याला सॅम्पल म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात येतं. ऑस्ट्रेलियात किंडरगार्टन येथील मुलांवर या किटचा वापर करण्यात आला आहे. येथील सरकारनं मोठ्या प्रमाणात मुलांच्या टेस्टींगसाठी याचा वापर सुरू केला आहे. मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी लॉलीपॉप टेस्टींग किट प्रभावी ठरत आहे. त्याचबरोबर 15 मिनिटांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळतो.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

बाबो! सापाच्या हल्ल्यात मांजराने हवेत घेतलेली झेप पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

पाचवीतील मुलीनं सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र, म्हणाली….

“आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल”

मोठी बातमी! मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More