बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2 फुटी असल्याने लग्न जमेना, थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांनाच म्हणाला; मॅडम…

नवी दिल्ली | सध्या अनेक तरूणांना आपल्या लग्नासंबंधी अडचणी येत आहेत. अडचणी म्हणजे काही तरूणांना सरकारी नोकरी नाही म्हणून कोण मुलगी देत नाही तर काहींना नोकरी असते मात्र तरीही मुलगी भेटत नसल्याचं आपल्या कानावर आलं असेल. अशाप्रकारे उत्तर प्रदेशमदील शामली जिल्ह्यातील 26 वर्षाचा मोहम्मद अजीमलाही हीच अडचण आहे.

अजीमला मुलगी न मिळण्याला त्याची उंची कारणीभूत ठरत आहे. कारण अजीमची उंची अवघी 2 फूट आहे. अनेक महिन्यांपासून तो लोकांना त्याचं लग्न लावून देण्याची मागणी करत आहे. मात्र कोणीही त्याची मदत करण्यास तयार नाही. वैतागलेला अजीम थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि स्टेशनमधील महिला अधिकारी असलेल्या मॅडमलाच आपल्या अडचणीबद्दल माहिती दिली.

मॅडम माझं लग्न लावून द्या कधीपर्यंत मी एकटा राहू?, माझी उंची 2 फूट असल्याने मला नवरी मिळत नाय्ये. जरी मला नवरी मिळाली तर माझ्या घरातील लोकं माझं लग्न लावनू देत नाहीत. मात्र अजीमची ही मागणी पुर्ण झालेली नाही. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी तो एसडीएम आणि कोतवालाकडेही गेला होता. मात्र तिथेही त्याची निराशा झाली असून त्याची मागणी पुर्ण झालेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीही अजीमने अनेक अधिकाऱ्यांच्या पत्रासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता येत्या 3-4 वर्षात तो वयाची 30 वर्ष पुर्ण करेल पण तरीही त्याचं अजुन लग्न जुळत नसल्याने तो मात्र चांगलाच परेशान झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे’; ‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमधला वाद पेटला, भावाविरोधात फिर्याद दाखल

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

मलाच चपलीने मारलं! ‘या’ कारणाने महिलेच्या नाकातून येत होतं रक्त, डिलिव्हरी बॉयचा वेगळाच दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More