बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण आहेत डॉ. भागवत कराड?? ज्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलीये

मुंबई | मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष तसंच औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आपण पाहूयात कोण आहेत भागवत कराड ज्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलीये…

कोण आहेत भागवत कराड-

डॉ. भागवत किशनराव कराड रा. चिखली ता. अहमदपूर जि. लातूर या मूळ गावचे आहेत. ते मूळात शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचं सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण अंधोरी जि. प. शाळेत झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी संस्थेच्या मोफत वसतीगृहात राहून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून प्री मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1972 साली त्यांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून एमबीबीएस व एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी त्यांनी संपादन केली.

एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अति उच्च पदवी एम. सीएच (पेडियाट्रीक) ही पदवी त्यांनी मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे ते वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर ठरले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री व भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांची भेट झाली. मुंडेंनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. समाजसेवा, विकास आणि सुशासन करण्याचं तत्व मनात घेऊन त्या ध्येयाने 1995 साली ते संभाजीनगर महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.

1998 साली कराड यांना औरंगाबाद शहराचा उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. जनतेचे प्रेम आणि आशिर्वादामुळे त्यांना 1995 ते 2009 पर्यंत 3 वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1999 व 2006 मध्ये औरंगाबाद शहराचे ते दोन वेळा महापौर राहिले.

ट्रेंडिंग बातम्या-

“आडनाव गांधी असल्यावर राहुल नावाचा नेताही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास पात्र ठरतो”

कोरोनाच्या बातम्या बघून स्वत:ला घरात कोंडून घेतलं, दोघांवर मानसिक उपचार सुरु

महत्वाच्या बातम्या-

निष्ठावंतांना डावलत शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी

खडसेंच्या पदरी पुन्हा निराशा… राज्यसभेचं तिकीट नाकारलं; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…

ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More