Top News

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

मुंबई | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नाववर शिक्कामोर्तब केलंय.

दरम्यान कार्यकारी अध्यक्षपदासाठी चरणसिंह सप्रा यांची वर्णी लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे या सर्व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांच्या नावांची चर्चा सुरु होती. ज्यामध्ये अस्लम शेख, मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड यांच्या नावांचा समावेश होता.

प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे. तर समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती केली गेलीये.

थोडक्यात बातम्या-

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी!

“शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष”

रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाले…

धक्कादायक! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करत दिले चटके

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या