बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

रत्नागिरी | कोकणातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेवर थेट हात उगारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या वरून विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नाव विधिमंडळ अधिवेशनापासुन चांगलंचं चर्चेत आलं. तसेच अधिवेशना दरम्यानच्या वागणुकीमुळे व भाजपच्या 12 आमदारांना गैरवर्तन केल्याप्रकरणी तालिका अध्यक्ष असताना कारवाई देखिल त्यांनी केली होती. त्यामुळे वादात असलेलं नाव म्हणुन भास्कर जाधव हे नाव चांगलं चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना आपलं दु:ख सांगण्यासाठी व भेटण्यासाठी पुढे जाणाऱ्या महिलेवर भास्कर जाधव यांनी थेट हात उगारल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसुन येत आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

देशातील ‘या’ खासगीकरणाच्या मुद्यावरून डाॅ. अमोल कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते फिरत आहेत- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More