उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठिंबा सपा,बसपाला

लखनऊ | आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी सपा आणि बसपा यांच्या आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली असल्यानं भाजपनं दलित व्यक्तीला उमेदवारी दिली, तरी त्याला मतदान करू नका, असं आवाहन चंद्रशेखर आझाद यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी सपा आणि बसपा आघाडीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मायावती आणि अखिलेश यादव हे प्रचाराची सुरवात लखनऊ येथुन करणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला