बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

मुंबई | तीन वर्षापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील भीमा-कोरेगाव इथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाला म्हणजेच एनआयएला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. पण अखेर फडणवीस सरकारच्या काळात हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशी व्हावी, अशी मागणी वकिल प्रदिप गावडे यांनी केली होती.

कोरोनामुळे काही काळापासून एनआयएचं काम बंद होतं. आता 2 ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणी हिंसाचार भडकवल्याच्या आरोपांप्रकरणी अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचं सोमवारी निधन झालं. गेल्या वर्षी एनआयएने त्यांना अटक केली होती. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं होतं. भीमा कोरेगावच्या दंगलीसाठी अटक केलेल्यांवरील UAPA कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या खोट्या केसेस मागे घेण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली होती.

थोडक्यात बातम्या-

“काढ्या आणि योगामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली”

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधानांकडून विचारपुस

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड

“अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे शिवसैनिक नाराज”

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More