बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची शिवसेनेला टाळी

अहमदनगर | काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीसोबत मिळून निवडणूूक लढवू असं वक्तव्य केलं होतं. आता संजय राऊत यांचं वक्तव्य खरं होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का देत राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेला टाळी दिली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर महापालिकेत महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. अहमदनगर पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला अहमदनगर महापालिकेत महापौरपद मिळालं नव्हतं. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष राहिला होता.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. परंतू काँग्रेसच्या फक्त 5 जागा असल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं महत्व वाढलं आहे.

दरम्यान, 30 जून रोजी सकाळी महापौर निवडणुकीसाठी 30 जूनला सकाळी 11 वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. महापौरपद हे ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गाकरिता राखीव आहे. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे आता भाजपचा पत्ता कट होणार हे निश्चित झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरले, आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची चीनला जाणीव”

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

‘सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरुये’; ओबीसी नेते आक्रमक

आज ठरणार टेस्टचा बादशाह; राखीव दिवशी सामन्याची चुरस वाढली

तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More