बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता सहज मिळू शकतं!

नवी दिल्ली | राज्यासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी रेमडेसिविर हे इंजेक्शन वापरलं जातं, पण संपुर्ण देशात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावाधाव होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पाहता भारत सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. देशात कोरोना स्थिती सुधारत नाही तो पर्यंत ही निर्यात बंदी लागू केली गेली आहे. महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पूर्णपणे संपला होता. त्यानंतर देशभरात या इंजेक्शनचा काळाबाजार पहायला मिळत होता. हा काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिविर इंजेक्शनचं उत्पादन करतात, त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून वितरण झालं आहे, याचीही माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे. तर औषध निरीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याविषयी सातत्याने माहिती द्यावी लागणार आहे.

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार पाहून जिल्हास्तरावर कंट्रोल रूम तयार केल्या जाणार आहे. त्या संबंधित सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहे. मागणी वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या किंमती देखील वाढवल्या जात असल्याचं पाहून हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. तर पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक जारी केला गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

अर्धशतकानंतर नितीश राणाचं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या विशेष कारण

“इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत, रोहित पवारांना कुठून मिळालं?”

आनंदाची बातमी!; महाराष्ट्रातील एक कोटी लोकांना मिळालं सुरक्षाकवच

कोलकताने फोडला विजयाचा नारळ; राहुल-राणाच्या खेळीपुढे पांडे-बेयरस्टोची खेळी व्यर्थ

इंदोरीकर महाराजांचा थोडा वेळ गेला, मात्र ‘या’ मंडळींना चांगला झटका दिला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More