महाराष्ट्र मुंबई

अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.

सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा उपलब्ध असणार आहे.

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

थोडक्यात बातम्या-

नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना लाभ झाला- रामनाथ कोविंद

प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद

उद्या अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…- अजित पवार

मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही”

शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या