बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ कारणाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या तारखेत बदल

पुणे | कोरोना महामारीच्या भयानक संकटामुळे कित्येक महत्वाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी होऊ लागल्याने हळूहळू लांबणीवर पडलेल्या परीक्षा पुन्हा होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने देखील आता गेल्या कित्येक दिवसांपासून पुढे ढकललेल्या परीक्षा घेण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं घोषित केलं होतं. मात्र, ही परीक्षा आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

8 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत आहे. यामुळे 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या परिक्षेच्या तारखेत तीनवेळा बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी या परिक्षेसाठी जवळपास 10 लाख विद्यार्थी नोंदणी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे कमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘वाढदिवसानिमित्त काय भेट देणार?’; भास्कर जाधव म्हणाले, ‘स्वच्छ सुंदर चिपळूण’

चार दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना रद्द

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More