नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका देत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकी रक्कमेबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए अर्थात महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ होणार असल्याच्या चर्चा होत्या. यासोबतच गेल्या 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेला डीए होळीच्या सणाला मिळणार असल्याचंही गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जात होतं.
डीएमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चा होत असताना महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार नसल्याचं समोर येत आहे. 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार नसल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यापर्यंतची डीएची थकबाकी आहे. केंद्र सरकारने याबाबत निवेदन देखील जारी केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के डीए मिळत आहे. हा आकडा वाढून 34 टक्के होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून साई पल्लवीने नाकारली होती कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर!
“जगात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही”
कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर
अन् सकाळी सकाळी संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले…
गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’
Comments are closed.