बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही सभांमध्ये हिंदूत्ववादी भूमिका मांडली आहे. मशिदींवरील भोंग्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला आहे. त्यातच आता राज ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याची माहिती समोर येत आहे.

मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याने राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. मनसे नेत्यांनी आणि काही संघटनांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांची भेट घेत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पुर्वीचाच म्हणजे वाय प्लस असून पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार असणार आहे. राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्याने सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. जर कोणाला भीती वाटत असेलल तर संरक्षण द्यायला काही हरकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”

“मी माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे…”

रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा

राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More