मुंबई | रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी UK मधील कम्युनिकेशन नियामक कार्यालय कडून 20 हजार पौंड म्हणजे जवळपास 19 लाख 73 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
6 डिसेंबर रोजी रिपब्लिक भारतच्या ‘पूंछता है भारत’ हा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांबद्दल द्वेषयुक्त आणि भडकवणाऱ्या भाषेचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.
वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्कला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी UK मधील रिपब्लिक भारतची जबाबदारी सांभाळते.
कम्युनीकेशन नियामक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘ऑफकॉम’कडून चॅनेलला स्पष्टीकरण देण्याचे आणि पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही”
…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही- रोहित पवार
‘राजा इतना भी फकीर मत चुनो की…’; नवजोत सिद्धूंचा मोदींवर निशाणा
“राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार”
नरेंद्र मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा!