परभणी महाराष्ट्र

बर्ड फ्ल्यूचा धसका; परभणीत संध्याकाळपर्यंत ‘इतक्या’ हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणी | जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहेत.

परभणीत बर्ड फ्लूमुळं 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची माहिती समोर आल्यानं जिल्हा प्रशासनाचं तोंडचं पाणी पळालं आहे.

कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

संध्याकाळपर्यंत दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे. मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला

धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या