देश

अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. भाजप मुख्यालयाशेजारीच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काल सांयकाळी अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं होतं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वामी अग्निवेश दिल्लीत दाखल झाले होते. ते भाजप मुख्यालयाकडे जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन गेले.

दरम्यान, या अगोदरही स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. तसंच त्यांच्या अंगावरचे कपडे फाटेपर्यत मारहाण केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या