मुंबई | विधिमंडळ अधिवेशानात दोन्ही सभागृहांमध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. आज सावरकरांची पुण्यतीथी आहे. भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.
सावरकरांच्या गौरवाच्या प्रस्तावाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कामकाज सल्लागार समीतीच्या बैठकीत विधीमंडाळात हा प्रस्ताव आणण्याचा भाजपने आग्रह केला होता. मात्र, सत्ताधारी पक्षांनी याला विरोध केल्याने भाजपने टीका केली आहे.
हिंदुत्ववादी भूमिकेवरुन सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधायचा आणि सावरकरांच्या मुद्द्यावर सत्ताधारी तिन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
दरम्यान, सत्तेच्या लोभापायी शिवसेना सावरकरांचा आपमान सहन करत आसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर केली होती.
ट्रेंड्रिंग बातम्या-
हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घाला; दिल्ली पोलिसांना आदेश
पवारांशी पंगा घेणं पडलं महागात? कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा
मराठा आंदोलक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार- फडणवीस
Comments are closed.