जेएनयूमधील कंडोम मोजणाऱ्या भाजप आमदाराचा पत्ता कट!

नवी दिल्ली | राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपने नुकतीच आपली 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत भाजपने अनेक आमदारांचा पत्ता कट केला आहे. यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे ज्ञानदेव आहुजा यांचाही समावेश आहे.

आहुजा यांनी 2016 मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये दररोज 50 हजार हाडांचे तुकडे, सिगारेटचे 10 हजार थोटके आणि 3 हजार वापरलेले कंडोम सापडतात असं म्हटलं होतं.

दरम्यान, गेली 25 वर्ष राजस्थानमधील जनतेनं सतत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. त्यामुळे भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळणार!

-भाजपसाठी धोक्याची घंटा; लोकसभेतील जादूई आकडा गमावला