Top News देश

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

नवी दिल्ली | नवी दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी होत आहे. शेतकरी काही माहे हटायला तयार नाहीत. अशातच कुस्तीपटू आणि भाजपा नेत्या बबिता फोगाटने शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केलं आहे.

आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं, असं बबिता फोगटने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत, असं म्हणत बबिता फोगटने काँग्रेसवर निशाणा साधला. बबिताने यासंदर्भात ट्विट केलं आहे

दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. या आंदोलनावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

ऋतिक-कंगणा प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे; कंगणा संतापली, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या