Top News महाराष्ट्र राजकारण

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुणे | मंदिर उघडण्याचा मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिर्डीच्या साईबाबांकडे दर्शनासाठी साधूसंतांना अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचं दाखवून दिलंय. भारतीय जनता पार्टीतर्फे हिंदू भाविकांवर दादागिरी करणाऱ्या या कृतीचा तीव्र निषेध करतो.

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं खरं रूप या प्रसंगातून महाराष्ट्राने पाहिलं आहे. दर्शनासाठी आलेल्या साधूसंतांना सरकारने परवानगी तर दिलीच नाही तर उलट त्यांना अटक केली. हे राज्यात मोगलाई अवतरल्याचंच लक्षण असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या

हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात? उर्जामंत्र्यांचं धक्कादायक ट्विट

कलम 370 हटवलेला दिवस काश्मिरसाठी काळा दिवस; मेहबूबा मुफ्तींचा हल्लाबोल

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराची तारिख ठरली; ‘या’ तारखेला हातात घड्याळ बांधणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या