बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बार, पब, डिस्को चालतात मग गणेशोत्सव का नाही?”

मुंबई | कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून थैमान घातलं आहे. कोरोना महामारीमुळे मोठी जीवितहानी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनारूग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र यंदाही मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सरकारने येणारा गणेश उत्सवही साधेपणाने साजर करण्याचं आवाहन सर्व नागरिकांना केलं आहे. यावरून भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

बार, पब, डिस्को यांना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

गणेशोत्सवावर यंदाही ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारखे आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर दिलं जावं. तसेच यामाध्यामतून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी नियमावलीमध्ये काही मुद्दे आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही एकाही कोरोना रूग्णाच मृत्यु नाही

“पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’”

“भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत”

…..म्हणून कम्प्युटर पदवीधरांना आली काॅंग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More