“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये स्वतःवरील सर्व आरोप फेटाळल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा निवास्थानी बोलवलं होत. संजय राठोड यांना वर्षा निवासस्थानमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत रहावं लागलं होतं. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी 2-3 मिनिटे चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्थ होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काॅंग्रेसचे नेते नितीन राऊत हे सुद्धा वर्षा बंगल्यावर आले होते. मात्र, संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का?, याबाबत अजूनतरी काही माहिती नाही. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली. बहुधा कानात सांगितलं असावं. मी तुला उध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याबाबत अतुल भातखळकरांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली… आणि बहुधा कानात सांगितलं असावं… मी तुला उध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे… pic.twitter.com/uVFYfGnrGR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 25, 2021
थोडक्यात बातम्या-
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिणीचा पतीसह अपघाती मृत्यू
“धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेट केलं हे त्यांनाच ठाऊक”
कोरोना गेला खड्ड्यात! संभाजी भिडेंनी आमदारालाच काढायला लावला मास्
शिवाजी पार्कवरून काका पुतण्या आमने-सामने; वाचा काय आहे प्रकरण
इंदापूर तालुक्यातील जवान लक्ष्मण डोईफोडेंना आसाममध्ये वीरमरण!
Comments are closed.