“मुख्यमंत्री बलात्काऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेनं झोडलं पाहिजे”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने आणखीनच आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. पुणे पोलिसांच्या तपासावरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
बलात्कारी मंत्र्याला मुख्यमंत्री स्वतःच्या मांडीला मांडी लावून बसवून घेतात. याला(संजय राठोड) तर चपलेनं झोडला पाहिजे. जनतेच्या मनात त्याला स्थान राहिलंय का हे मुख्यमंत्र्यांनी पहावं. सगळा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे पाहतोय, मुख्यमंत्री महोदय… असल्या बलात्काऱ्यांना हाकलून द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
बलात्कारी नेते आणि मंत्र्यांना वाचवण्यासाठी सध्या राज्यात चढाओढ लागली आहे. या प्रकाराबद्दल वाईट वाटतं, अत्यंत चीड येते. अरे तुम्हाला लेकीबाळी दिल्यात, अशाप्रकारे मुलींसोबत गलिच्छ प्रकार करणाऱ्यांना तुम्ही तिकडे बसवणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला जरासुद्धा अधिकार नाही. सगळे पुरावे असताना हे सरकार असं वागत आहे. त्यामुळे कर नाहीतर डर कशाला?, असं मंत्र्यांना वाटत आहेत. त्यांना वाटतं आमचे बाप बसलेत आम्हाला वाचवायला. पण लक्षात ठेवा तुम्हाला खाली करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, जितक्यांचं वाटोळ केलंय तितक्यांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. या अशा प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनता आपल्या मुली तसेच बायकांना राजकारणात पाठवण्याचा विचार करणार नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या कार्यकाळात तरी असं होऊ देऊ नका, असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं.
थोडक्यात बातम्या-
माझ्या आईवर कॅन्सर ट्रिटमेंट चालू आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा- राखी सावंत
जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या स्टेडियमला दिलं जाणार नरेंद्र मोदींचं नाव!
‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
कुत्रा चावल्याच्या रागातून तरूणाने कुत्र्याचाच घेतला जीव!
Comments are closed.