बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीएम केअर फंडाच्या नावाखाली भाजप नेत्यांनी दिलेली वेबसाईट फेक?

मुंबई | पीएम केअर फंडासाठी भाजप नेते मदत मागत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मी देशासोबत आहे तुम्हीही या फंडात योगदान द्या, असं आवाहन राज्यातील नेत्यांद्वारे केलं जातंय, मात्र हे आवाहन वादात सापडलं आहे.

पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांनी मदत मागताना फेक वेबसाईट दिल्याचा आरोप केला जातोय. वास्तवात ही वेबसाईट फेक असल्याचं प्रथमदर्शनी दिसंतय. http://pmcaresfund.online/ ही ती वेबसाईट आहे जी राज्यातील दिग्गज भाजप नेते प्रमोट करत आहेत.

https://www.pmcares.gov.in ही पीएम केअर फंडासाठी अधिकृत वेबसाईट आहे, मात्र वरील वेबसाईट यापेक्षा वेगळी असल्याचं दिसतंय. तसेच ही साईट पेमेंट गेटवेसाठी सुरक्षित नसल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअरसाठी आवाहन केल्यानंतर ही वेबसाईट तयार करण्यात आली असून तिचा हू इज डाटा देखील उपलब्ध नाही.

दरम्यान, राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटर तसेच फेसबुक खात्यांवरुन पीएमकेअरफंड.आॅनलाईन हा यूआरएल शेअर केला आहे. पीएम केअर फंडाच्या नावाखाली याआधीही गुगल पेचा गैरवापर करुन घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्क कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण

आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील सरपंचाच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; फोन करून केली आपुलकीने चौकशी

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न; नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More